Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील जंगलास आग लागून हजारो झाडे बेचिराख

संगमनेर तालुक्यातील जंगलास आग लागून हजारो झाडे बेचिराख

Trees were destroyed in a forest fire in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: गुरुवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावाजवळील चिंचोली रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलास अचानक आग लागल्याने हजारो वृक्षरोप जळून बेचिराख झाली आहेत.

पाच एकर क्षेत्रातील नवीन लागवडीतील रोपे भक्षस्थानी पडले आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमक बंबने पाणी मारून आग विझविण्यात आली मात्र हजारो वृक्ष जळून राख झाली होती.

तळेगाव दिघे या गावाच्या पश्चिमेला सुमारे पाच एकराहून अधिक क्षेत्रात विविध वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली होती. ह्या पावसाळ्यात चांगला पाउस झाल्याने रोपे बहरू लागली होती. मात्र गुरुवारी दुपारी जंगलास अचानक आग लागल्याने वाळलेल्या गवताने आगीने चांगलाच जोर घेत काही वेळातच जंगलाचा मोठा परिसर भक्ष स्थानी पडला होता. याबाबत माहिती समजताच सरपंच बाबासाहेब कांदळकर व युवक कार्यकर्ते यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. ही आग जंगलास कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.   

Web Title: Trees were destroyed in a forest fire in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here