संगमनेर तहसील येथे रॉकेल ओतून आत्मदहन करणाऱ्या वृद्धाचा अखेर मृत्यू
संगमनेर | Sangamner: संगमनेर तहसील व शहर पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या अनिल शिवाजी कदम या वृद्धाचा लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी दुपारी मृत्यू झाला आहे.
भाडेकरू सादिक शेख व समेय्या शेख हे आपल्याला त्रास देत असल्याचे अनिल कदम यांनी १० जानेवारी रोजी सर्व संबंधित अधिकारी यांना निवेदन पाठविले होते. त्यांच्यावर कारवाई करून मला न्याय द्यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी आपण आत्मदहन करू असा इशारा त्यांनी निवेदनात दिला होता. निवेदन देवूनही प्रशासनाने कोणतेही दखल घेतली नसल्याने कदम यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. यावेळी हे वृद्ध गंभीररित्या भाजले असल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाला निवेदन देवूनही कोणतेही गांभीर्य न घेतल्याने या वृद्धाला जीव गमाविण्याची वेळ आली आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Sangamner tehsil has finally old man died