Home अहमदनगर संगमनेर: टपाल कार्यालय फोडलं, घरे फोडली

संगमनेर: टपाल कार्यालय फोडलं, घरे फोडली

Sangamner Theft post office was blown up

Ahmednagar  Crime News | अहमदनगर | संगमनेर : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील टपाल कार्यालय फोडले तसेच परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत या परिसरातील अनेक घरे फोडली. (Theft) बुधवारी पहाटे ही घटना घडली. चोरट्यांनी टपाल कार्यालयही तोडले. हे कार्यालय फोडून चोरट्यांनी भिंतीत बांधलेली तिजोरीही खणून काढून पळवून नेली. यामध्ये किती रक्कम होती याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.  

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ आणि घारगाव परिसरात बुधवारी पहाटे चोरट्यांनी घरे फोडून चोरी केली. घारगाव येथे टपाल कार्यालय आहे. त्यामध्ये सिमेंट व दगडामध्ये बांधकाम केलेली लोखंडी तिजोरी होती. चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. भिंतीतील लोखंडी तिजोरी खणून कढली आणि चोरून नेली आहे. ही बाब सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी गावातील पोस्टमन किशोर पोळ यांना घटनेची माहिती दिली.

पोळ यांनी कार्यालयात येऊन पाहणी केली आणि वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक अधीक्षक संतोष जोशी, सबपोस्ट मास्तर सुमंत काळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घारगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तिजोरीत नेमकी किती रक्कम होती, याची माहिती मिळालेली नाही तसेच पहाटे नांदूर खंदरमाळ या दोन्ही ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरे फोडली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं आहे.

Web Title: Sangamner Theft post office was blown up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here