Home क्राईम वडगाव पान येथे बॅटऱ्या चोरणारी टोळी रंगेहाथ पकडून सिनेस्टायलने धुतले

वडगाव पान येथे बॅटऱ्या चोरणारी टोळी रंगेहाथ पकडून सिनेस्टायलने धुतले

Sangamner Vadgaon pan battery theft

संगमनेर(Sangamner): तालुक्यातील वडगाव पान येथे बॅटऱ्या चोरणारी टोळी रंगेहाथ पकडून त्यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन केले.

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शिवाजी दत्तात्रय थोरात यांच्या शेतजमिनीत असलेल्या एटीसी मोबाईल टावर जवळील बॅटऱ्या चोरटे काढत असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास लक्षात आल्याने परिसरातील राहणाऱ्या नागरिकांनी एकमेकांना जागे करीत त्याठिकाणी धाव घेतली त्याच वेळी पळून जाण्याचा प्रयत्न चार चोरट्यांनी केला. तिघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले तर एक जण फरार झाला आहे. ग्रामस्थांनी चोरट्यांना सिनेस्टायलने चोप दिला व नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वडगाव पान येथील युवकांनी चोरट्यांना पकडण्याचे धाडस दाखविले.

मोबाईल टावरच्या १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या तसेच स्कॉर्पियो गाडी जप्त करण्यात आली आहे. या चोरी प्रकरणी विठ्ठल मच्छिंद्र वर्पे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून यानुसार आरोपी विशाल उत्तम नारायणे, संदीप कैलास कराळे दोघही रा. शेंडी ता. जि. नगर आनंद मोहन वर्मा रा. मध्यप्रदेश, सोनू चंदेल या चौघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner Vadgaon pan battery theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here