Coronavirus: शिर्डीत करोनाचा वाढता प्रवाह
Coronavirus/शिर्डी: गेल्या पंधरा दिवसांपासून शिर्डीत करोनाने विळखा घातला आहे. शिर्डीत करोनाची साखळी थांबण्याचे नावच घेत नाही. करोनाची साखळी सैल होण्याची चिन्ह काही दिसत नाही.
गुरुवारी पाठविण्यात आलेल्या ३० जणांपैकी तीन करोनाबाधित आढळून आले आहेत. खासगी तपासणीतून एकाच कुटुंबातील चार जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे शिर्डी वासीयांची धाकधूक वाढली आहे. कालपर्यंत शिर्डीत ७८ रुग्णांची नोंद झालेली आहे.
मात्र प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेऊन तातडीने पाठविण्याचे काम केले जात आहे. शिर्डी सध्या लॉकडाऊन आहे. प्रशासनाचे काम पाहता शिर्डीकर लवकरच मोकळा श्वास घेतील असा विश्वास देखील प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच शिर्डीत चिंता वाढण्याची शक्याता वर्तविण्यात येत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Shirdi increased Flow