Home Suicide News दुधाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

दुधाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Rahuri Daradgav farmer suicide 

राहुरी(Rahuri): दुधाचे भाव कोसळल्याने आलेल्या नैराश्यातून राहुरी तालुक्यातील दरडगाव येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी रेवणनाथ मुरलीधर काळे या शेतकऱ्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या केली आहे.

काळे यांच्या कुटुंबाची गुजराण पूर्णतः दुध व्यवसायावरच सुरु होती. काळे यांच्याकडे २० जनावरे आहेत, दररोज ७० ते ८० लिटर दुध डेअरीला जाते. मात्र दुधाला भाव कमी झाल्याने त्याची आर्थिक परिस्थिती खालावली गेली. या परिस्थितून त्याच्या जीवनात नैराश्य येऊन त्याने विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असे त्यांचे बंधू अरुण काळे याने सांगितले.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Rahuri Daradgav farmer suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here