Home संगमनेर Sangamner: संगमनेरात तळेगाव शिवारात संपूर्ण टेम्पो जळाला

Sangamner: संगमनेरात तळेगाव शिवारात संपूर्ण टेम्पो जळाला

Sangamner whole tempo burned in Talegaon 

संगमनेर | Sangamner: छोट्या टेम्पोला वायरिंगचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागून संपूर्ण टेम्पो जळाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चालक बचावला आहे. ही घटना तळेगाव दिघे शिवारातील निळवंडे कॅनॉल जवळ बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी नागरिकांनी द बर्निग टेम्पोचा थरार अनुभवला.

कोपरगाव येथून छोटा टेम्पो चालक राम ज्ञानेश्वर नागरे वय ३२ रा, कोपरगाव हे मोबाईल टावरसाठी आईल व डिझेलचे टंक घेऊन तळेगाव दिघे या गावाकडे येत असताना तळेगाव शिवारातील निळवंडे कॅनॉल जवळ आला असताना पाठीमागून येणाऱ्या प्रवाशांनी नागरे यांना टेम्पोला आग लागल्याचे सांगितले. या चालकाने टेम्पो कडेला घेतला. मात्र  आईल व डिझेलचे टंकयांनी पेट घेतल्याने आगीचा भडका पेटला. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न केला. संगमनेरच्या अग्निशमनने आग विझविली मात्र छोटा टेम्पो जळून खाक झाला होता. वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुले आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Sangamner whole tempo burned in Talegaon 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here