अहमदनगर: शाळकरी मुलाचा विजेचा शॉक बसून जागेवर मृत्यू
Ahmednagar News: 15 वर्षीय शाळकरी मुलाचा शेतात औत हाकताना विजेचा शॉक बसून जागेवर मृत्यू झाल्याची घटना.
शेवगाव: तालुक्यातील मुर्शदपूर येथील 15 वर्षीय शाळकरी मुलाचा शेतात औत हाकताना विजेचा शॉक बसून जागेवर मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.27) दुपारी घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेली माहिती अशी की, चैतन्य जनार्दन ढाकणे (15 ) हा इयत्ता आठवीतील शाळकरी मुलगा रविवारी सुट्टी असल्यामुळे सकाळी शेतात पाळी घालण्यासाठी औत घेऊन शेतात गेला होता.
दुर्दैवाने एक विजेचे वायर औताखाली आल्यामुळे विजेचा करंट लोखंडी औतात उतरला आणि चैतन्यला जोराचा शॉक बसल्याने तो जागेवर खाली कोसळला. त्याला कुटुंबियांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा अगोदरच मृत्यू झाल्याचे घोषित केले. शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Schoolboy died on the spot due to electric shock
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App