Home अहमदनगर अहमदनगर: पतीला उतरवून पत्नीला घेऊन आरोपी फरार

अहमदनगर: पतीला उतरवून पत्नीला घेऊन आरोपी फरार

Ahmednagar News: पतीला दुचाकीवरून उतरवित पत्नीला घेऊन आरोपी फरार (accused) झाल्याची घटना.

Accused absconded with the wife after dropping off the husband

अहमदनगर: तुमचे राहिलेले पैसे काढून देतो, असे सांगून पती-पत्नीला दुचाकीवर बसविले. काही अंतरावर गेल्यानंतर पतीला दुचाकीवरून उतरवित पत्नीला घेऊन आरोपी फरार झाल्याची घटना तारकपूर रस्त्यावर शनिवारी (दि. २६) घडली. पतीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश माणिकराव गावंडे (रा. पिंपरी, ता. आखुड, जि. अकोला) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत रावसाहेब दिनकर शिंदे (रा. निंबळक, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पत्नीसह काम शोधण्यासाठी मॅककेअर हॉस्पिटलला गेले होते. तिथे त्यांना मंगेश गावंडे भेटला. त्याने तुमचे साई एशियन हॉस्पिटलमध्ये राहिलेले पैसे काढून देतो, असे म्हणून त्या पती-पत्नीला दुचाकीवर बसविले. काही अंतरावर गेल्यानंतर आरोपीने तारकपूर येथे दुचाकी थांबविली व फिर्यादी यास मारहाण केली. तसेच तू पायी चालत ये, आम्ही मोटारसायकलवरून जातो, असे सांगून आरोपी फिर्यादीच्या पत्नीला दुचाकीवरून घेऊन गेला. त्यांचा शोध लागला नाही.

Web Title: Accused absconded with the wife after dropping off the husband

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here