Home क्राईम संगमनेरात बालकांवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल  

संगमनेरात बालकांवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल  

Sexual abuse of children in Sangamner

संगमनेर: संगमनेर शहरालगत गोल्डन सिटी परिसरात अल्प वय असलेल्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना घडली आहे.

सचिन चांगदेव केदारी रा. देवाचा मळा असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, आरोपी सचिन केदारी वासनेच्या भरात लहान मुलांना तुम्ही गज चोरी केले आहे. मी तुमच्या घरच्यांना सांगेल अशी धमकी दिली. तसेच मुलांना स्कुटी गाडी शिकवितो असे आमिष दाखवून या मुलांना गोल्डन सिटी जवळील काटवनात निर्जनस्थळी नेऊन या नराधमाने अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक छेडाछाड केली. त्यांच्या शरीराशी चाळे करून त्रास दिला. यावेळी मुलांनी त्याच्या ताब्यातून कशीबशी सुटका करून घर गाठले. आणि हा सर्व प्रसंग आईला सांगितला.

या दोन्ही परिवाराने मुलांना धीर देत संगमनेर पोलीस स्टेशन गाठत आरोपी सचिन केदारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे करीत आहे.  

Web Title: Sexual abuse of children in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here