जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन सुरु, जाणून घ्या काय सुरु व काय बंद
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक ९ एप्रिल शुक्रवारी सायंकाळी ८ वाजेपासून ते दि. १२ एप्रिलसोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार २०२२ रुग्ण नव्याने जिल्ह्यात आढळूण आले आहेत. दररोज दोन हजारापेक्षा जास्तीची संख्या आढळून आल्याने हा संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बेडची संख्या: जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या पाहता लॉकडाऊन करणे अत्यावश्यक आहे.
एकूण: १०,७३६ उपलब्ध: ५,८१०
आयसीयु बेड: ९७५, उपलब्ध २७५
ऑक्सिजन बेड: २,३१८ उपलब्ध: ५६८
जिल्ह्यात मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.
कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडणार नाही.
जिल्ह्यातील संपूर्ण आस्थापना पूर्ण बंद ठेवाव्यात असे प्रशासनाने आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Web Title: Ahmednagar Weekend Lockdown Started