स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने १० लाखांना लुटले
जामखेड: पुणे येथील एका व्यक्तीस स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे याठिकाणी बोलावून १५ ते २० जणांच्या टोळीने १० लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वस्तात सोने देतो या बहाण्याने पुणे येथील हडपसर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला अमोल, रामा (पूर्ण नाव माहिती नाही), परमेश्वर काळे व इतर अज्ञात १५ ते २० जणांनी सांगितले की, आमच्याकडे स्वस्तात सोने देण्यासाठी शिल्लक आहे असे सांगून विश्वास संपादन केला. यांनतर आरोपींनी सदर व्यक्तीस जामखेड तालुक्यातील पाटोदा गराडाचे या परिसरात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बोलावले. यावेळी बाजूला १५ ते २० जण दबा धरून बसले होते. दबा धरून बसलेल्या आरोपींना इशारा करताच आरोपी घटनास्थळी आले व फिर्यादी यांनी आणलेले १० लाख ७ हजार रुपये व ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ऐवज कोयता व तलवारीचा धाक दाखवून लुटून नेण्यात आला.