Home अकोले तहसील कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याच्या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावू: तहसीलदार मुकेश...

तहसील कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याच्या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावू: तहसीलदार मुकेश कांबळे

Akole sort out all the issues regarding the road Mukesh Kambale

अकोले (प्रतिनिधी):  ठेकेदाराने अपूर्ण ठेवलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातात अनेकांचे बळी गेल्याचा आरोप करत, ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अपूर्ण राहिलेला हा रस्ता अजून किती जणांचे बळी घेणार असा तीव्र संताप व्यक्त करत आज अकोलेतील कोल्हार घोटी महामार्गावर या रस्त्याच्या कामासाठी आज सर्वपक्षीयांचे व इंदोरी ग्रामस्थ यांचे वतीने पथिक पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले.

अकोले येथील कोल्हार घोटी रस्त्यावर झालेल्या या तीव्र आंदोलनात जनतेच्याही संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला आणि एक महिन्याच्या आत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदाराकरवी देण्यात आली.तब्बल तीन तास चाललेले आंदोलन यशस्वी झाले असले तरी ठेकेदाराने या कामात दिरंगाई केली तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

अकोले  कोल्हार घोटी या रस्त्याचे काम सुरू आहे अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम मंदावल्याने आहे त्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या खराब रस्त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे.याच रस्त्याने जात असताना सागर उर्फ विशाल नवले या तरुणाचा मोठा अपघात झाला आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.यामुळे त्या ठेकेदारप्रती अकोले तालुक्यात संतापाचा उद्रेक झाला या ठेकेदाराने कामाकडे खूप दिवसांपासून दुर्लक्ष केल्यानेच या खराब रस्त्याचा सागर नवले हा नाहक बळी ठरला असा आरोप करत या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आंदोलकांनी आंदोलनस्थळी केली.यापूर्वीही या खराब व अपूर्ण रस्त्यामुळे अपघातामुळे मृत्यूच्या घटना घडल्या असल्याची माहितीही यावेळी आंदोलकांनी दिली.

सर्व प्रथम सागर नवले याला श्रद्धांजली वाहून आंदोलन सुरू करण्यात आले. या ठेकेदाराच्या विरोधात अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय जोरदार आंदोलन झाले यामध्ये अशोकराव भांगरे, वकील वसंत मनकर, अशोक देशमुख ,महेश नवले, मिनानाथ पांडे,मारुती मेंगाळ, सुरेश नवले,प्रदीप हासे,प्रदीप नवले, भानुदास तिकांडे,दौलत नवले, वैभव नवले, सिताराम नवले विकास देशमुख, प्रमोद मंडलिक रामहरी तिकांडे ,  विकास देशमुख, सचिन देशमुख,रवी मालुंजकर , राजाभाऊ कुमकर,अनिल कोळपकर यांच्या सह इंदोरी चे व अकोलेचे ग्रामस्थ मोठया संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

आंदोलन चालू असताना शासनाचे प्रतिनिधी व ठेकेदार न आल्याने आंदोलक संतप्त झाले होते.अखेर ठेकेदाराचा प्रतिनिधी, कार्यकर्ते, तहसीलदार मुकेश कांबळे पोलीस निरक्षक अभय परमार यांची आंदोलन ठिकाणी चर्चा झाली. चर्चा अंती येत्या काही दिवसात ठेकेदाराबरोबर अकोले येथे बैठक लावणे,त्यामध्ये रस्त्याच्या अनुषंगाने नुकसानभरपाई व इतर प्रश्न सोडविण्यात येणार आहे, तसेच रोडलगत हे विजेचे खांब शिफ्टिंग करण्यात यावेविहीर बुजविणे आणि पहिल्या 15 दिवसात इंदोरी ते अकोले व पुढील 15 दिवसात शेकईवाडी ते  किमान कळस पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदार मार्फत देण्यात आल्याने तीन तास सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र यानंतरही ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाबाबत चालढकल झाली तर आंदोलकांच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

यावेळी अशोकराव भांगरे यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अपूर्ण काम ठेवू नये अशी मागणी केली. मिनानाथ पांडे यांनी या रस्त्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती देत हे आंदोलन गांभीर्याने घेण्यात यावे व सागर नवले यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. वकील वसंतराव मनकर म्हणाले की, सागर नवले याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.महेश नवले यांनी आंदोलन कोणत्या कारणामुळे मागे घेण्यात आले त्या मागण्या सर्वांसमोर मांडले व या रस्त्याचे काम आत्ताच चालू करण्यात यावे असे सांगितले. अशोकराव देशमुख यांनी तीव्र शब्दात ठेकेदारावर टीका करीत काम पूर्ण केले नाही तर ठेकेदाराला बांधून ठेवण्यात येईल असा इशारा दिला. तर माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांना  अश्रू अनावर झाले होते. संदीप दराडे यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण झाले नाही तर ठेकेदाराच्या तोंडात शेण घालण्याचे आंदोलन करू असा इशारा दिला.

“ठेकेदाराने एका महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिल्याने आपण ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सर्व प्रमुख पक्षाचे प्रमुख प्रतिनिधी यांची पुढील आठवड्यात तहसील कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याच्या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावू.”

तहसीलदार मुकेश कांबळे

Web Title: Akole sort out all the issues regarding the road Mukesh Kambale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here