Home अहमदनगर Murder: परीक्षेसाठी गेलेल्या तरुणाचा निर्घुण खून, हात तोडून नेला

Murder: परीक्षेसाठी गेलेल्या तरुणाचा निर्घुण खून, हात तोडून नेला

murder of a young man who went for an examination

पाथर्डी | Murder: विकास देवीचंद चव्हाण वय २३ रा. पाथर्डी जि. अहमदनगर हा तरुण भारतीय रिझर्व बँकेची लिपिक पदाची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला गेला असता कब्रस्तानात नेऊन त्याची हत्या करण्यात आली आहे.

हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांनी या तरुणाचा हात एका कोपरापासून धडावेगळा करून सोबत नेला अथवा कोठेतरी फेकून दिल्याचे चित्र घटनास्थळी आढळून आले. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

रिझर्व बँकेच्या परीक्षेसाठी विकास हा नगर जिल्ह्यातून गुरुवारी रात्री औरंगाबादकडे आला होता, आज शुक्रवारी सकाळी महापालिका कार्यालयाच्या मागे कब्रस्तानात त्याचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या तरुणाची सकाळी ८ वाजता परीक्षा होती. या युवकाचा एक हात कोपरापासून तोडून तो गायब आहे. हात मिळून आलेला नाही. तसेच त्याच्या छातीत चाकू खुपसण्यात आला, गळा कापण्यात आला. याबाबत सिटी चौक पोलीस ठाण्याला अज्ञात व्यक्तीने फोन करून माहिती कळविली.

माहिती समजताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक अविनाश आघव यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास ऑ=पोलीस करीत आहे.  

Web Title: murder of a young man who went for an examination

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here