Home अकोले खड्डेमय रस्त्यामुळे अपघातातील तरुणाचा मृत्यू, ग्रामस्थांचे आंदोलन

खड्डेमय रस्त्यामुळे अपघातातील तरुणाचा मृत्यू, ग्रामस्थांचे आंदोलन

Akole death of a young man in an accident

अकोले: कोल्हार घोटी महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.या महामार्गावर एका बाजूला डांबरीकरण व एका बाजूला खोदलेला खड्डेमय रस्ता यामुळे अपघात वाढ झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचे (Accident) प्रमाण वाढले आहे.

सागर नवले रा. इंदोरी याचा महिनाभरापूर्वी या महामार्गावर पान ओहळ शिवारात खड्डे चुकवत असताना मोटारसायकलचा अपघात झाला होता. त्याच्यावर नाशिक व नगर येथे रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याने महिनाभर मृत्यूशी लढा दिला. मटार बुधवारी दुपारी त्याने अखेरचा श्वास घेतला. इंदोरी प्रवरा तिरावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सागरच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला खड्डेमय रस्ता अजून किती लोकांचे बळी घेणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे रस्त्याचे काम रखडलेले दिसून येत आहे. अकोले तालुक्यात या रस्त्याचे काम ठप्प आहे. ठेकेदारांची मुजोरी वाढली आहे. कोल्हार घोटी या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे म्हणून आज शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन पानओहळ परिसरात सुरु आहे. इंदोरी व रुंभोडी या गावांतील ग्रामस्थ व सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी हे आंदोलन केले आहे.  

नागरिक आपला जींव धोक्यात घालून प्रवास करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आतातरी जागे होणार का?  ठेकेदारांची मुजोरी बंद होणार का? रस्त्याचे काम तातडीने होणार का? या प्रश्नांचे उत्तरे आता येणारा काळच ठरवील. 

Web Title: Akole death of a young man in an accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here