Home क्राईम विद्यार्थीनीवर अत्याचार, नराधम शिक्षकाला अटक

विद्यार्थीनीवर अत्याचार, नराधम शिक्षकाला अटक

नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लैंगिक अत्याचार (sexual abused ).

sexual abused of a student, killer teacher arrested

यवतमाळ: शिक्षक विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुसद येथील कारला मार्गावरील एका कॉन्व्हेंटमधील शाळेतील शिक्षकाने कोविडच्या काळात व्हॉट्सअपवर ऑनलाइन शिक्षणाचा फायदा घेऊन एका मुलीशी जवळीक साधली. त्यानंतर तिला विविध आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लैंगिक अत्याचार केले. पुसद येथील वसंतनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका कॉन्व्हेंटमधील शिक्षकाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक करुन त्याची २७ जूनपर्यंत कोठडी घेतली आहे.

शिक्षकाकडून त्रास वाढल्याने मुलीने आपल्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर शिक्षकविरुद्ध वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) एफएन (१), ३७६ (३), पोक्सो ४, ६, १० नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षक आदित्य ऊर्फ मंगेश शंकर वाठोरे यास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेने पुसदच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: sexual abused of a student, Teacher arrested

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here