Home क्राईम जांभूळ देण्याचे आमिष दाखवून नराधमाने मुलीवर लैंगिक अत्याचार

जांभूळ देण्याचे आमिष दाखवून नराधमाने मुलीवर लैंगिक अत्याचार

Nanded Crime News:  जांभूळ देण्याचे आमिष दाखवून नराधमाने मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual abuse) केला.

a girl was sexually abused by being lured to give her purple

नांदेड: अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हादरला आहे. अर्धापूर तालुक्यातील देळुब (बु.) शिवारात ही घटना घडली. जांभूळ देण्याचे आमिष दाखवून नराधमाने मुलीवर लैंगिक अत्याचार  केला. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

अर्धापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अर्धापूर तालुक्यातील देळुब (बु.) येथील 13 वर्षीय मतिमंद मुलीवर 30 वर्षीय नराधमाने अत्याचार केला आहे. याप्रकरणी नराधमाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल चांदोजी वाघमारे असे नराधम आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला जांभूळ देण्याचे आमिष दाखवून शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर प्रकार लक्षात येताच पीडित मुलीच्या वडिलांनी अर्धापूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेवून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड, कपिल आगलावे, राजेश घुन्नर, संदीप आणेबैनवाड, पप्पू चव्हाण, प्रकाश पोवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. आरोपीविरुद्ध बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: a girl was sexually abused by being lured to give her purple

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here