Home अहमदनगर वाळू तस्करांचा महसूल पथकावर हल्लाबोल; पोलिसांचा गोळीबार

वाळू तस्करांचा महसूल पथकावर हल्लाबोल; पोलिसांचा गोळीबार

Ahmednagar News: पोलिसांवर वाहने घालण्याचा प्रयत्न वाळू तस्करांकडून करण्यात आला, शासकीय बंदुकीने हवेत एक गोळी फायर (Firing), वाळू तस्करांची सात वाहने पथकाने ताब्यात.

Sand smugglers attack revenue squad Police firing

श्रीरामपूर:  सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा गौण खनिज अधिकारी वसीम सय्यद यांच्यासह पोलिसांवर वाहने घालण्याचा प्रयत्न वाळू तस्करांकडून करण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या दिशेने एक मोठा जमाव चालून येत असल्यामुळे पोलिस हेडकॉन्स्टेबल बारवकर यांनी त्यांच्याकडील शासकीय बंदुकीने हवेत एक गोळी फायर केली. त्यानंतर जमाव पांगला. दरम्यान, श्रीरामपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाळू तस्करांची सात वाहने पथकाने ताब्यात घेतली आहेत.

अवैध वाळू व्यावसायाविरुद्ध जिल्ह्यातील सिंघम अधिकारी म्हणून परिचित असलेले जिल्हा गौण खनि कर्म अधिकारी वसिम सय्यद यांनी तालुक्यातील गोवर्धन येथील गोदावरी नदीपात्रात छोटा हत्ती टेम्पोतून येत धडक कारवाई केली. या दरम्यान, 50 ते 60 जणांच्या जमावाने महसूल पथकावर हल्लाबोल केला. वाळूतस्करांचा मोठा जमाव आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच गांभीर्य लक्षात घेऊन पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बारवकर यांनी पथकाच्या व स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार करत वाळूतस्करांना पिटाळले. त्यामुळे अनर्थ टळला.

पोलिसांनी 7 वाहने मिळून 35 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अहमदनगर येथील गौण खनि कर्म विभागाचे रॉयल्टी निरीक्षक अशोक भगवान कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एकूण श्रीरामपूर शहर व तालुक्यातील 50 ते 60 आरोपीविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील 7 आरोपींना तात्काळ अटक करुन उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

नदीपात्रातून गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वाळू वाहतूक सुरु असून या कारवाई विरोधात सय्यद या खमक्या अधिकार्‍याने कायदेशीर कारवाईची धमक दाखविली. मात्र श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी गोदावरी भागात वाळू वाहतुकदारांबरोबर खुलेआम फिरताना दिसतात. त्यामुळे या कारवाईनंतर नागरिकांमध्ये दबक्या आवाजात याविषयी चर्चा सुरु होती.

गौण खनिकर्म अधिकारी सय्यद यांनी अनेकवेळा गोदावरी नदीपात्रात कारवाईचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मागावर अनेक वाळुतस्कर नजर ठेवून असल्याने त्यांना यश आले नव्हते. काल त्यांनी मोटारसायकल तसेच छोट्या टेम्पोतून प्रवास करत ही कारवाई दणक्यात केली. त्यामुळे वाळूतस्कर सैरभैर झाले आहेत.

गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळुउपसा होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे अशा अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचा निर्णय सय्यद यांनी घेतला. त्यानुसार ते रॉयल्टी निरीक्षक कुलथे व अहमदनगर पोलीस मुख्यालयाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बारवकर, पोलीस नाईक गणेश शिंदे असे पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकासह काल रात्री 12 वाजेच्या सुमारास ते गोवर्धन येथील गोदावरी नदीपात्रात पोहचले. मात्र सरकारी वाहनांऐवजी ते आपल्या बरोबर एक पोलीस व एक अव्वल कारकूनास घेऊन छोट्या टेम्पोतून याठिकाणी आले. नदीपात्रात 7 गाड्या बेकायदेशीर वाळू भरताना आढळून आल्या. त्यावेळी सय्यद छोट्या टेम्पोतून खाली उतरले त्यांनी या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

यावेळी वाळू भरण्यासाठी हजर असणारे तसेच ट्रकचालक मालक व इतर असे एकूण 50 ते 60 लोक सदर पथकावर धावून आले व तुम्ही कुठले पथक आहे? औरंगाबाद पथकाचे इकडे काय काम आहे? असा सवाल करत आरडाओरडा करून ट्रक चालकांना पथकाच्या अंगावर ट्रक घाला असे सांगत चालकांना उत्तेजीत केले. त्यामुळे ट्रक चालकांनी सदर पथकाच्या दिशेने ट्रक चालवून पथकातील अंमलदारांना ट्रकखाली घालण्याच्या उद्देशाने ट्रक चालविल्या त्यामुळे गांभीर्य लक्षात घेत पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बारवकर यांनी पथकाच्या व स्वत:चा जिव वाचविण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या सरकारी कारबाईन शस्त्रातून 1 गोळी हवेत फायर केली. त्यामुळे ट्रक चालक व इतर आरोपी गाड्या सोडून पळून गेले.

अधिकारी कारवाईसाठी आल्याचे समजताच नदी पात्रात वाळू भरणारे व वाळूतस्करांची धावपळ उडाली. गाड्यांच्या ताफ्याऐवजी छोट्या टेम्पोतून अधिकारी आल्याने त्यांचा गोंधळ उडाला. यावेळी वाळू भरणार्‍यांनी ज्या टेम्पोतून अधिकारी आले त्या चालकासही धक्काबुक्की केली.

दरम्यानच्या काळात सय्यद यांनी पोलीस अधिकारी व तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांच्याशी संपर्क साधून फौजफाटा मागितला. काही वेळातच पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, तहसीलदार वाकचौरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, सफी गायमुख, श्री. ओटी, प्रशांत रणनवरे, दादासाहेब लोढे, नितीन चव्हाण, सजिद शेख, चाँद पठाण फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी नदीपात्रातील 7 गाड्या ताब्यात घेतल्या. त्यातील एक वाहन बंद असल्याने 6 गाड्या जप्त करण्यात आल्या. नंतर त्या श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आल्या. या गाड्यांपैकी दोन गाड्यांवर क्रमांक असून अन्य 4 गाड्या विनाक्रमांकाच्या आहेत. या गाड्या कोणाच्या मालकीच्या आहेत याचा तपास सुरु असल्याचे तहसीलदार श्री. वाकचौरे यांनी सांगितले.

याप्रकरणी सलीम जहागिरदार (श्रीरामपूर), आसिफ केंची (श्रीरामपूर), फरीद (पूर्ण नाव माहित नाही, श्रीरामपूर), राजू गुंजाळ, विजू पवार, विशाल गुंजाळ, सलीम कुरेशी, वसीम अफसर सय्यद (रा.वांजरगाव, ता.वैजापूर), सुनिल साळवे (रा.श्रीरामपूर), शफीक शेख (रा.श्रीरामपूर), राजू मोरे (रा.जाफराबाद), शुभम खरात, अंबादास बर्डे, गौतम शेळके, पवन उपडकर (रा.रामपूर), मिलिंद धनवटे, फारूक पठाण, विशाल बाळासाहेब खैरे (रा.रामपूर), फारूक कमू पठाण (रा.जाफराबाद), भारत नानासाहेब पांढरे (रा.रामपूर), साकीब सईद शेख (वॉर्ड नं. 2 श्रीरामपूर), प्रमोद जालिंदर चांदणे (वडाळा महादेव), राहुल शांताराम जाधव (रा.वडाळा महादेव), दिनेश अशोक आमले यांच्यासह 20 ते 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी विशाल बाळासाहेब खैरे (रा.रामपूर), फारूक कमु पठाण (रा.जाफराबाद), सागर रावसाहेब जाधव (रामपूर), भारत नानासाहेब पांढरे (रा.रामपूर), साकीब सईद शेख (रा.श्रीरामपूर), प्रमोद जालिंदर चांदणे (रा. वडाळा महादेव) व दिनेश अशोक आमले (रा. शिरसगाव) या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Sand smugglers attack revenue squad Police firing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here