Home अकोला खासगी वसतिगृहात युवतीची आत्महत्या

खासगी वसतिगृहात युवतीची आत्महत्या

मुलींच्या एका खासगी वसतिगृहात NEET परीक्षेचीची ययारी करीत असलेल्या १७ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना.

Suicide of a girl in a private hostel

अकोला : शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या मुलींच्या एका खासगी वसतिगृहात NEET परीक्षेचीची ययारी करीत असलेल्या १७ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

रविवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेली युवती जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील रहिवासी आहे. आत्महत्या मागील  नेमकं कारण अद्याप समजू  शकलेले नाही. या घटने संदर्भात सिव्हिल लाइन्स पोलिसांना माहिती देण्यात आली.  पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात पाठविला.

युवतीचे वडील चंद्रकांत बोदडे हे पोलिस दलात कार्यरत आहेत. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केलीआहे.  अधिक तपास पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे करीत आहेत.

Web Title: Suicide of a girl in a private hostel

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here