Home महाराष्ट्र लग्नानंतर दोन दिवसांतच तरुणीची प्रियकरासह आत्महत्या

लग्नानंतर दोन दिवसांतच तरुणीची प्रियकरासह आत्महत्या

Jalgaon: लग्न झालेल्या युवतीने प्रियकरासह आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Young woman committed suicide with her boyfriend within two days of marriage

पाचोरा | जळगाव: गेल्या शुक्रवारी लग्न झालेल्या युवतीने प्रियकरासह आत्महत्या केल्याची घटना सिंधी कॅम्प परिसरात एका पडक्या शाळेत रविवारी रात्री घडली. साक्षी सोमनाथ भोई (१८) आणि जितेंद्र राजेंद्र राठोड (१८) अशी त्यांची नावे आहेत.

साक्षीचा विवाह २३ जून रोजी शिंदखेडा येथे झाला होता. लग्नानंतर रविवारी ती माहेरी पाचोरा येथे आली होती. अंगावरील हळद फिटण्याआधीच तिने प्रियकरासह आत्महत्या केली. साक्षी आणि जितेंद्र वरखेडी नाका परिसरात एका गल्लीत राहायला होते. जितेंद्र याच्याशी साक्षीचे पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. या घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Young woman committed suicide with her boyfriend within two days of marriage

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here