Home कोपरगाव दर्शना पवारची हत्येचा राहुल हंडोरेकडून उलगडा, हत्येची कबुली म्हणाला कटरने वार करुन...

दर्शना पवारची हत्येचा राहुल हंडोरेकडून उलगडा, हत्येची कबुली म्हणाला कटरने वार करुन त्यानंतर डोक्यात….

Pune Crime:  कटरने वार करुन त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून (Murder) केल्याची कबुली हंडोरे याने दिली आहे.

Darshana Pawar's murder revealed by Rahul Handore, confession of murder

पुणे:  दर्शना पवारचा खून माझ्याकडून अनावधनाने झाल्याची कबुली मारेकरी राहुल हंडोरे याने पोलिसांना दिली आहे. सुरुवातीला कटरने वार करुन त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 12 जून रोजी दर्शना व राहुल हे एकत्रितरित्या दुचाकीवर राजगड किल्यावर फिरावयास गेले होते. त्यावेळी दर्शना आणि राहूल किल्ल्यावरून फिरून एकाठिकाणी थांबले होते. सदर जागी लग्नाचे कारणावरुन त्यांच्यात जोरदार वाद झाल्यावर राहुल याने कटर ब्लेडने तिच्या शरीरावर तीन ते चार वार केले. यामध्ये एक कटरचा वार तिच्या गळयाला लागून त्यातून मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. सदर रक्तस्त्राव थांबत नसल्याने राहुल घाबरला आणि त्याने जवळच पडलेला दगड उचलून तिच्या डोक्यात घालून तिचा निघृण खून केला. त्यानंतर घटनास्थळावर तिला सोडून त्याने पळ काढला असल्याचे त्याने स्पष्ट केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षेतून वन अधिकारी झालेल्या दर्शना दत्तू पवार (वय-26) हिचा निर्घृण खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना राजगड किल्ल्याच्या परिसरात मिळून आला होता. याप्रकरणी तिचा मित्र राहुल हंडोरे (28, रा. शाह, ता. सिन्नर, नाशिक) याला पोलिसांनी अटक केली आहे.

दर्शना पवार ही एमपीएसीतून वन अधिकारी झाल्यावर तिच्या कुटुंबींयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. याचा राग लहानपणापासून तिच्या ओळखीचा व एमपीएससी परीक्षेची तयारी सोबत करणार्‍या राहूल याला आला होता. दर्शना हिला परीक्षेसाठी सर्व प्रकारची मदत राहूल करत होता आणि मागील तीन ते चार वर्ष त्यांनी एकत्रितरित्या पुण्यात परीक्षेची तयारी केली होती. मात्र, संबंधित परीक्षेत राहुल याची थोडक्यात संधी हुकली तर दर्शना उत्तीर्ण झाली होती. त्यानंतर तिने आपल्यासोबत बोलण्यास व राहण्यास टाळाटाळ सुरूवात केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

Web Title: Darshana Pawar’s murder revealed by Rahul Handore, confession of murder

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here