Home महाराष्ट्र शरद पवारांना नारायण राणेंचा टोला, पार्थविषयी बोलले असे

शरद पवारांना नारायण राणेंचा टोला, पार्थविषयी बोलले असे

Sharad Pawar about Narayan Rane's smash about Parth Pawar

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना मेडियासमोर फटकारले होते. आता या प्रकरणावरून भाजप राष्ट्रवादीत राजकारण रंगले आहे. पार्थ पवार हा १८ वर्षाचा आहे. त्याने लोकसभा  निवडणूक लढवली आहे. त्यामुळे पार्थ हा परिपक्वच आहे असा टोला भाजपा खासदार नारायण राणे यांनी शरद पवार यांना लगाविला आहे.

नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पार्थ हा राजकारणात आलेला आहे. त्याचे १८ वर्ष पूर्ण झालेले आहे. आणखी त्याने मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविली आहे. सुशांत प्रकरणी पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली यात त्याचे स्वतः चे काही विचार असतील म्हणून केली असेल मागणी असे नारायण राणे यांनी सांगितले. त्याचबरोबर सुशांत प्रकरणात मी कधी आदित्य ठाकरेच नाव घेतले नाही. मेडियानेच नावघेतले आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. न्यायालय निर्णय घेईल. मात्र संजय राउत वारंवार सांगतायेत की आदित्यचा या प्रकरणाशी संबंध नाही असे सांगत असल्याने संशय वाढत आहे असा टोला नारायण राणे यांनी संजय राउत यांना दिला आहे.  

Website Title: Sharad Pawar about Narayan Rane’s smash about Parth Pawar

See Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here