Coronavirus: अकोले तालुक्यात आज १८ कोरोना बाधित
Coronavirus | अकोले: अकोले तालुक्यात आज १८ करोनाबाधित आढळून आले आहेत. एकट्या कोतुळ गावातच ०८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. तालुक्यातील करोनाबाधितांची एकुण संख्या २९९ इतकी झाली आहे.
रॅपिड ॲन्टीजन मध्ये १५ खाजगी प्रयोगशाळेत ०२ तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील एक अशी एकुण १८ कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आज रविवारी सकाळी खानापुर कोविड सेंटर मध्ये घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये तालुक्यातील १५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. यामध्ये तालुक्यातील कोतुळ येथील तब्बल ०८ पॅाझिटीव्ह आलेत.यात६१ वर्षीय महीला, ८५ वर्षीय महीला, ३३वर्षीय महीला, २५वर्षीय महीला, १३ वर्षीय युवती, ०८ वर्षीय मुलगी, १५ वर्षीय युवक, ०३ वर्षीय मुलगा,हिवरगाव आंबरे येथील ६० वर्षीय महीला, ५० वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथील २१ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथील ५० वर्षीय महीला, समशेरपुर येथील ३४ वर्षीय पुरुष, कळस येथील २९ वर्षीय महीला अशी १५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात घोडसरवाडी (समशेरपुर) येथील ६१ वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय महीला व अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील अहवालात मनोहरपुर येथील ६० वर्षीय पुरूषाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे त्यामुळे आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.
तालुक्यातील एकुण संख्या २९९ झाली आहे.त्यापैकी १९८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सध्या ९४ व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर ७ व्यक्ती मयत झालेल्या आहे.
अलताफ ईस्माईल शेख संपर्क (७३८७०२०५९७) पञकार, अकोले
Web Title: Akole Taluka Today 18 coronavirus infected