Home अकोले भंडारदरा धरणाने यंदा मोडला इतिहास, धरण तांत्रिकदृष्ट्या भरले

भंडारदरा धरणाने यंदा मोडला इतिहास, धरण तांत्रिकदृष्ट्या भरले

Bhandardara Dam overflow today

Bhandardara Dam | भंडारदरा: भंडारदरा धरण आज सकाळी १० हजार ३६६ दशलक्ष घनफूट झाला होता. रविवारी सकाळी धरणातून ३ हजार २६८ पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धारण तांत्रिकदृष्ट्या भरले अशी माहिती कार्यकारी उप अभियंता अभिजित देशमुख यांनी जाहीर केली आहे.

भंडारदरा धरण हे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला भरत असते असा पूर्व इतिहास आहे. मात्र यंदा धरण पाणलोटक्षेत्रात उशिरा पाउस सुरु झाल्याने एक दिवस उशिरा भरले. पाणी पातळी रोखण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

भंडारदरा पाणलोटक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाउस सातत्याने पडत आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. निळवंडे धरणसुद्धा भरण्याच्या मार्गावर आहे. निळवंडे धरण ७३.६१ टक्के भरले. पाणीसाठा वाढल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Bhandardara Dam overflow today

Get Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here