Home महाराष्ट्र Election: पाच राज्यांच्या निकालानंतर शरद पवार यांचे वक्तव्य

Election: पाच राज्यांच्या निकालानंतर शरद पवार यांचे वक्तव्य

Sharad Pawar's statement after the election results of five states

मुंबई | Five State Election Result: पंजाबमध्ये आपची एक हाती सत्ता आली आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चांगली कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळेच केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपला पंजाबमध्ये मोठा विजय मिळवता आला आहे. तसेच पंजाबमधील वातावरण भाजपास अनुकूल नव्हते. तर पंजाबमधील पराभव काँग्रेसला धक्का देणारा आहे.

महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र तयार है,  अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला उत्तर दिले. तसेच महाराष्ट्रात काही फरक पडणार नसल्याचे वक्तव्य पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

पवार पुढे म्हणाले की, दिल्लीमध्ये आप सरकारने चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा लाभ आपला पंजाब निवडणुकीत झाला. त्यामुळेच त्यांना मोठा विजय मिळाला आहे. पंजाब वगळता चार राज्यात भाजपला जनतेने कौल दिल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. पाच राज्यात काँग्रेस कुठे कमी पडली, हा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसबाबत मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. पाच राज्यांतील पराभवामुळे विरोधकांनी नाउमेद होण्याची गरज नाही. पंजाबमधील परिस्थिती काँग्रेसला चांगली होती. परंतु पंजाबमधील बदल जनतेने स्वीकारले नाहीत.

सर्व विरोधकांशी चर्चा करून भाजपला पर्याय देण्याबाबत विचार करू, या निकालानंतर महाविकास आघाडी सरकार मोठे कष्ट घेईल. तसेच महाराष्ट्रातील सरकार टिकेल, आणि पुन्हा सत्तेवर येईल, असाही आशावाद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना मिळालेले यश नजरेआड करण्यासारखे नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे. आता विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक आहे, याचा विचार करण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.

Web Title: Sharad Pawar’s statement after the election results of five states

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here