Home महाराष्ट्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष अत्याचार

Rape Case Two years of torture on a minor girl threatening to make a photo viral

जळगाव | Jalgaon Crime: औरंगाबाद रेाडवरील सुप्रीम कॉलनीच्या विस्तारीत भागातील एका अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सलग दोन वर्ष अत्याचार (Rape) करत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी  संशयीताला अटक केली आहे.

याप्रकरणी दीपक सोनवणे याला अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगावातील फुले मार्केट येथे १६ वर्षीय मुलगी कपडे खरेदीसाठी येत- जात असताना तिच्याशी दिपक सोनवणे याने ओळख करुन मैत्री केली. मैत्रीनंतर या मुलीशी सलगी करत फुले मार्केट येथे अत्याचार करण्यात आले. नंतर काही दिवसांनी संशयिताने त्याच्या काकाच्या घरी मध्यप्रदेश येथील कखनाटुके ईथळ या गावी नेऊन सलग अत्याचार (sexual abusing) करुन मोबाईलमध्ये तिचे फोटो, व्हिडीओ काढण्यात आले.

याबाबत कोठे काही वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारुन टाकेल. भेटण्यास नकार दिला तर तुझे फोटो व्हायरल करुन बदनामी करेल, अशी धमकी दिल्याने गेल्या दोन वर्षापासून मुलगी अन्याय सहन करत होती. मात्र, प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने अखेर पीडितेने कुटूंबीयांना सर्व प्रकार कथन केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  संशयित दीपक सोनवणे याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत.

Web Title: Rape Case Two years of torture on a minor girl threatening to make a photo viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here