Home अहमदनगर अकरा वर्षीय मुलाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत खून

अकरा वर्षीय मुलाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत खून

Shevgaon Murder by stabbing a boy in the neck

शेवगाव | Murder: शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे अकरा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. 

सार्थक अंबादास शेळके असे या हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञातविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, घराशेजारी काम करत असताना घरी मोबाईल आणण्यासाठी गेलेल्या सार्थकच्या मानेवर धारदार शास्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने शेवगाव तालुका हादरला आहे. या बालकाची हत्या कोणी व कशासाठी केली याचा तपास लावण्याचे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर आहे.

खुंटेफळ येथील अंबादास शेळके हे सोमवारी दुपारी आपल्या कुटुंबांसोबत आपल्या घराशेजारी असलेल्या वाडग्यात काम करत होते. यावेळी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अंबादास यांनी मुलगा सार्थक यास घरात असलेला मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. वडिलांनी मोबाईल आणण्यास सांगितल्याने सार्थक घरात गेला बराच वेळ झाला तरी सार्थक का आला नाही हे पाहण्यासाठी शेळके गेले असता सार्थक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. सार्थकच्या मानेवर धारदार शस्त्राने कोणीतरी वार केला होता. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी चार ते साडे चार दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलीस ठाण्याचे प्रभाकर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Shevgaon Murder by stabbing a boy in the neck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here