Home संगमनेर संगमनेरचे आमदार सप्ताहात पंक्तीत वाढतात तेव्हा….

संगमनेरचे आमदार सप्ताहात पंक्तीत वाढतात तेव्हा….

Sangamner News: थेट आयोजकांकडून आमटीची बादली घेत उपस्थित भावीक भक्तांना आमटी वाढण्याचे काम करत धार्मिक कार्यात कुणीही लहान मोठा नाही हे दाखवून दिले.(MLA Amol Khatal).

showed that no one is too small or too big in religious work MLA Amol Khatal

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथे सुरू असणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठ गमन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सप्ताहात आ. अमोल खताळ नुसते सहभागी झाले नाही तर त्यांनी पंगतीमध्ये भाकरी आमटीच्या महा प्रसाद घेतलाच परंतु आपण संगमनेर तालुक्याचे आमदार आहोत अन पंक्तीत कसे वाढायचे याची कुठली तमा न बाळगता त्यांनी थेट आयोजकांकडून आमटीची बादली घेत उपस्थित भावीक भक्तांना आमटी वाढण्याचे काम करत धार्मिक कार्यात कुणीही लहान मोठा नाही हे दाखवून दिले आहे.

संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमनास ३७५ वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने  संगमनेर अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील बोटा येथे संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यातील आसपास च्या १०० गावांच्या सहभागातून हा महो त्सव सुरू आहे या अखंड हरिनाम सप्ता हात संगीत गाथा पारायण ,प्रवचन, व किर्तन सोहळा ३० डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे या तीन सात दिवसाच्या कालावधी मध्ये संत तुकाराम महाराज गाथा पारायण नामांकित महाराष्ट्रातील  संतांची वंशज असलेले कीर्तनकार यांचे कीर्तन तसेच प्रवचन या धार्मिक कार्यक्रमाचा ही परिसरातील भावी फक्त लाभ घेत आहे. दररोज येणाऱ्या भावी भक्तांच्या उपस्थितीने बोटा नगरीला देहूनगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी बोटा येथे सुरू असणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठ गमन महोत्सवाला भेट दिली  बोटा ग्रामस्थांच्या वतीने त सप्ताह आयोजक,पठार भागा च्या वतीने बोटा गावचे सरपंच पांडुरंग शेळके, मा.पं.स. सदस्य संतोष शेळके यांनी आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आ अमोल खताळ यांचेसमवेत मनसे रस्ते व्यवस्थापन समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोके,भाजप भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश फटांगरे, शिवसैनिक गुलाब भोसले,पूजा सोनवणे,अमित शेळके,खंडू जाधव,अमित कुलकर्णी,पप्पू कुरकुटे,गणु काका ,सचिन बोडके,रवी शेळके,विजू पानसरे ,रमेश काळे, दत्तात्रय महाराज भोर महाराज किशोर महाराज धुमाळ,अमोल महाराज बोडके,अक्षय महाराज बोडके,निलेश ,आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

माझे आई वडिलांचे आशीर्वादाने अन् वारकरी सांप्रदायाचे आशीर्वादाने मी आमदार झालो.माझ्या विजयात वारकरी सांप्रदायाचा मोठा वाटा आहे. धर्माचं काम गुप्ततेत झाले पाहिजे.त्यामुळे या धार्मिक कार्यासाठी हवी ती मदत करेल- आमदार अमोल खताळ.

Web Title: showed that no one is too small or too big in religious work MLA Amol Khatal

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here