Home अहमदनगर श्रीगोंदा: रेल्वे मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरून अपघात

श्रीगोंदा: रेल्वे मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरून अपघात

Shrigonda Twelve coaches of a train derailed

श्रीगोंदा: श्रीगोंदा येथून ३ किलोमीटर अंतरावर दौडहून मनमाड कडे जात असलेल्या मालगाडीचे १२ डबे रूळावरून घसरल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र दौंड मनमाड लोह मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती.

तसेच या रेल्वे रुळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या रेल्वे अपघाताने रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात घडल्यानंतर या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या या स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. या सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाडीला एकूण ४२ डबे होते. यामधील १२ डबे रुळावर घसरले. या घटनेबाबत बेलवंडी व श्रीगोंदा माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दिलीप तेजनकर व पोलीस नाईक प्रकाश मांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीस वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Web Title: Shrigonda Twelve coaches of a train derailed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here