Home अहमदनगर पोस्टात बचत केलेली रक्कम पोस्टमास्तराने केली परस्पर हडप

पोस्टात बचत केलेली रक्कम पोस्टमास्तराने केली परस्पर हडप

Kopargaon amount saved in the post was usurped by the postmaster

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील राहत असलेल्या तीन महिलाच्या नावावरील पोस्टात टाकलेली ४० हजार २०० रुपयांची रक्कम पोस्ट मास्तराने बनावट सह्या करून हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कोपरगाव पोलीस ठाण्यात आरोपी पोस्ट मास्तर रविंद्र बाळासाहेब जाधव यांच्या विरोधात डाक निरीक्षक विनायक सोन्याबापू शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, धरणगाव येथील महिला लताबाई विष्णू चौधरी, मीराबाई निवृत्ती कदम, विठाबाई सीताराम आभाळे यांनी अल्पबचत करण्यासाठी पोस्टात आपली नियमित ठेव ठेवली होती. आरोपी पोस्ट मास्तर रवींद्र जाधव याने याबाबत बनावट नोंदी करून खातेदाराच्या नावावरून परस्पर रक्कम काढून ते सरकारी खात्यात जमा न करता ते वैयक्तिक कारणासाठी वापरले. ही बाब पोस्टखात्यातील निरीक्षक विनायक शिंदे यांच्या लक्षात आली. याबाबत महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली. त्यामुळे कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस निरीक्षक व उप निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन परीस्थितीची पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहे.

Web Title: Kopargaon amount saved in the post was usurped by the postmaster

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here