Home अहमदनगर फेसबुकवर मैत्री करून ७० लाखांना गंडा घालणाऱ्या आरोपीस अटक

फेसबुकवर मैत्री करून ७० लाखांना गंडा घालणाऱ्या आरोपीस अटक

Accused arrested for befriending 70 lakh on Facebook

अहमदनगर: उच्च शिक्षीत व्यक्तीला परदेश महिला असल्याचे दाखवून फेसबुकवर मैत्री करून ७० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नगरच्या सायबर क्राईम पोलिसांत तक्रार दाखल झाली होती.

सदर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने परदेशी महिला असल्याचे भासवून त्याच्या साथीदारामार्फत आयुर्वेदिक कच्चा माल खरेदी करण्याचा बहाणा करून खोटी कागदपत्रे तयार करून ७० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केलेली होती.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला.

संशियीत आरोपी हा दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी इदूह इब्राहीम वय ३३ रा, दक्षिण दिल्ली यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. हा आरोपी नायजेरियन नागरिक आहे, फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणाऱ्या टोळीचा तो एक सदस्य आहे. त्याला न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Accused arrested for befriending 70 lakh on Facebook

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here