Home अकोले Akole: अकोले तालुक्यात दोन दिवसांत १० व्यक्ती करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात दोन दिवसांत १० व्यक्ती करोनाबाधित

Akole taluka two days 10 corona positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी ३ बाधित आढळून आले आहे तर आज बुधवारी सात जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३१०५ इतकी झाली आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात पिंपळगाव निपाणी येथील २२ वर्षीय तरुणी, गणोरे येथील ५५ वर्षीय महिला, शिवाजी रोड अकोले येथील ५८ वर्षीय पुरुष असे तीन जण बाधित आढळून आले आहेत.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात समशेरपूर येथे ५५ वर्षीय महिला, २८ वर्षीय तरुण, ४० वर्षीय पुरुष, देवठाण येथील ७० वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, शेकईवाडी अकोले येथे ३८ वर्षीय महिला, विथे येथे ५० वर्षीय पुरुष असे आज ७ जण बाधित आढळून आले आहेत. मंगळवारी आणि बुधवारी प्राप्त झालेले हे सर्व अहवाल खासगी रुग्णालयातून प्राप्त झाले आहेत. तालुक्यात चाचण्या घेण्यात आल्या मात्र एकही बाधित आढळून आलेला नाही.   

Web Title: Akole taluka two days 10 corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here