Home अहमदनगर जिल्ह्यातील या गावात सरपंच, उपसरपंचाना कार्यालयात कोंडले

जिल्ह्यातील या गावात सरपंच, उपसरपंचाना कार्यालयात कोंडले

Shrirampur village, the Sarpanch and the Deputy Sarpanch are locked in the office

श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथे कामे होत नसल्याने विरोधी सदस्यांचे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.  विविध मागण्यांसाठी उंदीरगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच यांना बाहेरून कुलूप लावून कोंडून घेतले शोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके व योगीता निपुंगे यांनी उंदीरगाव ग्रामपंचायतीत कोणतेच काम वेळेवर पूर्ण होत नसल्याने तसेच केलेले काम हे चांगल्या दर्जाचे नाही. महिन्यापासून ग्रामस्थांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. चार महिने मशीन बसविले पण सुरू केले नाही. सार्वजनिक शौचालय 5 महिन्यांपासून बांधूनही नागरिकांना वापरण्यासाठी खुले केले नाही. या मागण्यांसाठी कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी सरपंच व उपसरपंचाना कार्यालायात कोंडून बाहेर टाळे लावण्यात आले.

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले. या आंदोलनप्रसंगी दिलीप गलांडे, बाळासाहेब घोडे, अमोल नाईक, किशोर नाईक, मनोज बोडखे, बाळासाहेब निपुंगे आदी उपस्थित होते.

Web Title: Shrirampur village, the Sarpanch and the Deputy Sarpanch are locked in the office

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here