Home Accident News Accident: संगमनेर शहरात कार दुचाकीत अपघात

Accident: संगमनेर शहरात कार दुचाकीत अपघात

Car two-wheeler accident in Sangamner

संगमनेर | Accident: संगमनेर शहरातील अकोले नाक्यावर एका कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, संगमनेर नगरपालिकेतील रोटरी क्लब मधून इलाज करून तिघे जण अकोलेकडे जात असताना अकोले नाक्यावर कारने दुचाकीवरील तिघांना धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून नागरिकांच्या मदतीने एका रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान रस्त्याची दुर्दशा, सिग्नल व्यवस्था, रस्त्याची अपूर्ण कामे अपघातांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा अपघातांची संख्या वाढतच राहील.   

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

Web Title: Car two-wheeler accident in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here