Home अकोले अकोले तालुक्यातील अंगणवाडी सेविकेस मारहाण व शिवीगाळ

अकोले तालुक्यातील अंगणवाडी सेविकेस मारहाण व शिवीगाळ

Anganwadi worker beaten and abused in Akole taluka Crime filed

अकोले | Crime: अकोले तालुक्यातील पिंपळदरवाडी येथील अंगणवाडीत अंगणवाडी सेविकेस मारहाण व शिवीगाळ करून दमबाजी केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात भा. द.वी. ३२३,५०४,५०६ कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चहाबाई पांडुरंग भांगरे वय ५३ रा. पिंपळदरवाडी एकदरा ता. अकोले यांनी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून साहेबराव भगवंता भांगरे रा. पिंपळदरवाडी याच्याविरोधात भा. द.वी. ३२३,५०४,५०६ कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

चहाबाई भांगरे यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, फिर्यादी या अंगणवाडी सेविका असून साहेबराव भांगरे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास पिंपळदरवाडी येथील अंगणवाडी येथे साहेबराव भांगरे यांनी शेरेबुक मागितले. त्यावर फिर्यादी यांनी मी मोबाईलवर ऑनलाईन माहिती भरत आहे थोडा वेळ थांबा असे म्हंटल्यावर साहेबराव भगवंता भांगरे स्वतः कपाट उघडू लागले. त्यावर फिर्यादी यांनी थांबा कपाट उघडू नका म्हणाल्याचा राग आल्याने फिर्यादीच्या तोंडात चापटीने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच तुला येथे नोकरी करू देणार नाही असा दम दिला असे फिर्यादीत म्हंटले आहे.

याप्रकरणी राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल डगळे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Anganwadi worker beaten and abused in Akole taluka Crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here