Home अहमदनगर अहमदनगर: प्रसिध्द मूर्तिकाराची दुकानात गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर: प्रसिध्द मूर्तिकाराची दुकानात गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Ahmednagar:  दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Siddha sculptor committed suicide by hanging himself in the shop

श्रीरामपूर : प्रसिध्द मूर्तिकार रोहिदास फकीरा राऊत (वय ६०) यांनी काल दुपारी बेलापूर रोड, गायकवाड वस्तीवरील त्यांच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी रोहिदास राऊत यांच्या नोकरांनी काही कामासाठी फोन केला मात्र ते उचलत नाही म्हणून शेजारील दुकानदारांनी दुकान उघडून पाहिले असता रोहिदास राऊत साडीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांना माहिती कळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहिदास फकीरा राऊत हे प्रसिद्ध मूर्तिकार असून चांगले कलाकारही होते.

Web Title: Siddha sculptor committed suicide by hanging himself in the shop

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here