Home Accident News समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, कार चारीत उलटली

समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, कार चारीत उलटली

Breaking News | Sinner: कारचा भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी.

Accident on Samriddhi Highway death of both

सिन्नर : नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर गुरुवारी (दि. १८) सकाळी ७.४५ च्या सुमारास सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात कारचा भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये बाजीराव एकनाथ गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला, तर निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या साईड बॅरियरला तोडून दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या चरीमध्ये जाऊन उलटली. चालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ व मीनाबाई रामकिसन गडगूळ (४६, सर्व रा. करमाड, ता. जि. संभाजीनगर) गंभीर जखमी झाले.

Web Title: Accident on Samriddhi Highway death of both

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here