Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीची छेड, जाब विचारला वडिलांना केली मारहाण, २६ जणांवर गुन्हा

संगमनेर: अल्पवयीन मुलीची छेड, जाब विचारला वडिलांना केली मारहाण, २६ जणांवर गुन्हा

Breaking News | Sangamner Crime: दोघांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढली. छेड काढलेल्या मुलांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांनाही मारहाण.

minor girl was molested, her father was beaten

संगमनेर:  मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढली. छेड काढलेल्या मुलांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांनाही मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.१८) संध्याकाळी पठार भागात घडली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले. ही घटना याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी ४:१५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी जात होती. त्यावेळी मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन, आदिनाथ अशोक वामन हे त्यांच्याकडील पल्सर मोटारसायकलवरून जात असताना मयूर वामन आणि आदेश वामन यांनी मुलीची छेड काढली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील तिथे गेले. तिथेही त्यांना मारहाण करण्यात आली. महिलेने फोन करुन त्यांना बोलावले.

संध्याकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास मुलीच्या वडिलांना सुमन उगले यांचा कॉल आला होता. या महिलेने त्यांना त्यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या माळावर चर्चा करून भांडण मिटविण्यासाठी बोलावले होते. मुलीचे वडील तेथे गेल्यानंतर उगले हिने कोणाला तरी फोन केल्यानंतर ५०-६० लोक जमा झाले. त्यांनी मुलीचे वडील आणि त्यांच्या नातेवाइकांवर दगडफेक केली. त्यांना गज, कुळवाचे लोखंडी पास, दगड, काठीने मारहाण केली.

मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन, आदिनाथ अशोक वामन, योगेश सखाराम उगले, तुकाराम लक्ष्मण कारंडे, भाऊ अनाजी वामन, सुमनबाई सखाराम उगले, अशोक लहानू वामन, पप्पू अशोक वामन, संदेश वसंत वामन, गणेश जयवंत वामन, सार्थक बाळू वामन, प्रणव शिवाजी वामन, दीपक शंकर डुबे, पप्पू छबू काळे, रामचंद्र साहेबराव काळे, वसंत अनाजी वामन, शिवाजी अनाजी वामन, जयवंत अनाजी वामन, लहानू नानाभाऊ वामन, अनाजी नानाभाऊ वामन, बाबू शंकर डुबे, अमित अशोक वामन, राहुल कारंडे (सर्व रा. शेंडेवाडी, ता. संगमनेर), बबलू बाळासाहेब शेंडगे (रा. बिरेवाडी, ता. संगमनेर), सचिन गजानन चितळकर (रा. साकूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या २६ जणांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली.

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक संतोष खेडकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: minor girl was molested, her father was beaten

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here