Home अहमदनगर बसस्थानकावर सासरे आंबे आणायला गेले अन् सून झाली बेपत्ता

बसस्थानकावर सासरे आंबे आणायला गेले अन् सून झाली बेपत्ता

Breaking News | Ahmednagar: बसस्थानक येथे सासरे आंबे आणायला गेले अन् सून अचानक बेपत्ता झाली.

bus station daughter-in-law went missing

जामखेड: यात्रेनंतर माहेराहून सासरी बोर्ले येथे सून आणि सासरे एसटी बसने चालले होते. जामखेड बसस्थानक येथे सासरे आंबे आणायला गेले अन् सून अचानक बेपत्ता झाल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१२) घडला. संस्कृती युवराज काकडे (वय १९, रा. बोर्ले, ता. जामखेड) असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत सासरे बापूराव हौसराव काकडे यांनी सून हरविल्याची तक्रार जामखेड पोलिस ठाण्यात दिली.

संस्कृती काकडे ही बुधवारी (दि.१०) बोर्ले (ता. जामखेड) येथून बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव मायंबा येथे माहेरी यात्रेसाठी सासरे बापूराव काकडे यांच्या बरोबर गेली होती. यात्रा झाल्यावर शुक्रवारी (दि.१२) संस्कृती व तिचे सासरे बोर्ले गावी जाण्यासाठी निघाले. सून व सासरे जामखेड बसस्थानकावर पोहोचले. तिथे सूनेने सासऱ्याला फळे आणण्यासाठी बसस्थानकाच्या बाहेर पाठविले, सासरे फळे घेऊन आल्यानंतर सून संस्कृती ही बसस्थानकात दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी बसस्थानक परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती मिळून आली नाही. त्यानंतर तिचे सासरे बापूराव काकडे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात धाव घेत सून हरविल्याची तक्रार दाखल केली.

दोन वर्षांपूर्वी संस्कृती हिचे युवराज काकडेबरोबर लग्न झाले होते. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष कोपनर हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: bus station daughter-in-law went missing

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here