Home अहमदनगर तर आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल, अण्णा हजारेंचा इशारा

तर आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल, अण्णा हजारेंचा इशारा

Anna Hazare: शिंदे फडणवीस सरकार पुन्हा मॉल मध्ये वाईन विक्रीचे संकेत.

So we have to go our own way, warns Anna Hazare

पारनेर: राज्यात सत्ता बदल झालेले आहे. यानंतर आता शिंदे फडणवीस सरकार पुन्हा मॉल मध्ये वाईन विक्रीचे संकेत दिले आहे. त्यामुळे अण्णा यांनी प्रतिक्रिया देत इशारा सरकारला दिला आहे.  

”मॉल संस्कृती ही आपली नाही. ती विदेशी संस्कृती आली. आताचे सरकार मॉलमध्ये वाईन (दारु) विक्रीचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. पण तसं झालं तर नाइलाजास्तव आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल” असा इशारा अण्णांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारनं मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

Web Title: So we have to go our own way, warns Anna Hazare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here