Home अहमदनगर शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar | Shrigonda: अल्पवयीन मुलीचा बसस्थानकावर विनयभंग (Molested) केल्याची घटना.

minor girl going for education was molested

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बसस्थानकावर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आढळगाव मध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला गावातील बस स्थानकावर गाडी ची वाट पाहत असताना गावातील दत्ता राजू शिंदे या युवकाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

मुलीने विरोध केल्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने या तरुणावर श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यावर घरी जाणेसाठी बस स्टॅण्डवर तीचे मैत्रिणीसोबत बसची वाट पाहत थांबलेली असताना यातील आरोपीने फिर्यादिचे जवळ येऊन तीचा हात पकडून तीस तु मला फार आवडते,असे म्हणून  लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादिने विरोध केल्याने त्याचा आरेापीस राग आल्याने त्यानी घाण घाण शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली . आरोपी  दत्ता राजु शिंदे रा.आढळगांव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई सुनिल सुर्यवंशी  करत आहेत.

Web Title: minor girl going for education was molested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here