दोन कोटी फसवणूक प्रकरणी जिल्ह्यातील सोनार पिता पुत्रास अटक
अहमदनगर | Fraud Case: मुंबई येथील सोने चांदी व्यापाऱ्याची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या सोनार पिता पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पिता पुत्रास अटक करण्यात आली आहे. त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिनेश प्रकाश मेहता वय ४७ रा. विलेपार्ले मुंबई यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात मागील आठवड्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, १२ जानेवारी ते ५ एप्रिल २०२१ या कालावधीत श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक २ येथील वैष्णवी अलंकार गृहचे मालक अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्वनाथ डहाळे यांनी मुंबई येथील दिनेश मेहता यांच्याकडून १ कोटी ९८ लाख ६ हजार ७५९ रुपयांची सुवर्ण व डायमंड अलंकार खरेदी केला. अलंकाराच्या रकमेची दिनेश मेहता यांनी अक्षय डहाळे व बाळासाहेब डहाळे यांच्याकडे मागणी केली. मात्र मेहता यांना रक्कम अथवा अलंकार दिले नाही उलट तुला जे करायचे ते कर, तुझे सोने व डायमंड अलंकार आम्ही देणार नाही, पैसेही देणार नाही असा दम दिला.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप उपनिरीक्षक समाधान सुरवाडे आदींच्या पथकाने कसून शोध घेत बाळासाहेब डहाळे व यांना रावळस पिंपरी ता. निफाड व अक्षय डहाळे यास उमरखेड येथून अटक केली आहे.
Web Title: Sonar father and son arrested in Rs 2 crore fraud case