Home क्राईम संगमनेर ब्रेकिंग: २५ लाखांच्या अपहार प्रकरणी सरपंचास अटक

संगमनेर ब्रेकिंग: २५ लाखांच्या अपहार प्रकरणी सरपंचास अटक

Sangamner Sarpanch arrested for embezzling Rs 25 lakh

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील मोठा अपहार उघडकीस आला आहे. ग्रामसेवकाच्या मदतीने २५ लाख २१ हजार ९११ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सारोळे पठार येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रशांत गवराम फटांगरे असे अटक केलेल्या सरपंचाचे नाव आहे. ग्रामसेवक सुनील शेळके अद्याप पसार आहे.

यामधील दोन्ही आरोपी फरार होते. रविवारी रात्री पोलिसांनी सरपंचाला अटक केली तर ग्रामसेवक फरार आहे. सरपंचाना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

माजी सरपंच फटांगरे आणि तत्कालीन ग्रामसेवक शेळके या दोघांनी २०१४-१५ ते २०१७-१८ या दरम्यान शासकीय निधीतून कामे न करता २५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. अमित बादशाह फटांगरे यांनी ग्रामपंचायत निधीत अपहार झाल्याची तक्रार दाखल केली होती. चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आर्थिक गैरव्यवहार व अनियामिता केल्याचा अहवाल दिला होता. त्यांनी काही म्हणणे सादर केले आहे. कामाचे अंदाजपत्रक घेणे, मुल्यांकन करणे,  कामांना ग्रामपंचायत सभेची मान्यता घेणे, या बाबींची पूर्तता न करता अपहार करण्यात आला होता.

Web Title: Sangamner Sarpanch arrested for embezzling Rs 25 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here