Accident: टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू
श्रीरामपूर | Accident: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर बाजार भरल्याने गर्दी झाली होती. याच गर्दीत बाजार करून पती पत्नी मोटारसायकलवरून घरी जात असताना दुधाच्या टँकरची धडक बसल्याने एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. निर्मला बाबासाहेब बुट्टे वय ५८ रा. खानापूर असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बाजार भरण्यास बंदी आहे. परंतु तरीसुद्धा श्रीरामपूर नेवासा महामार्गावर बाजार भरला. याच बाजारात बाजार करून पती पत्नी मोटारसायकलवरून घरी निघाले असता त्यांच्या मोटारसायकलला(एम.एच.१७ सीई ३४३३) दुधाच्या टँकरची (एम.एच. १७ बीवाय ६६८०) धडक बसली. यावेळी मोटारसायकलवरील महिला खाली पडल्याने टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने निर्मला बाबासाहेब बुट्टे वय ५८ रा. खानापूर या जागीच ठार झाल्या आहेत. पत्नीच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांचे परी बाळासाहेब बुट्टे यांनी केली आहे.
Web Title: Accident Woman dies after tanker wheel overturns