Home औरंगाबाद SSC HSC Exam Update: दहावी बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल, यापुढे असा बदल

SSC HSC Exam Update: दहावी बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल, यापुढे असा बदल

SSC HSC Exam Update 2023:  होमसेंटर सुविधा बंद, अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द.

SSC HSC Exam Update 2023

औरंगाबाद:  आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल करण्यात आला असून, औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती, विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव वाय.एस.दाभाडे यांनी सांगितले.

आता यापुढे असा असणार बदल..

2023 मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल.

यंदा होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही.

तसेच 80  गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही.

60-40 गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही.

यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. ( गेल्यावेळी 25% अभ्यासक्रम वगळला होता)

मात्र, दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यात परीक्षेत होम सेंटर देण्याचा निर्णय घेतला गेला होता. तर सोबतच 80  गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास देखील देण्यात आला होता. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने आगामी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी वरील निर्णय रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: SSC HSC Exam Update 2023

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here