Home क्राईम धक्कादायक! लॉजवर बोलावणाऱ्या तरुणाचे महिलेने कापले गुप्तांग

धक्कादायक! लॉजवर बोलावणाऱ्या तरुणाचे महिलेने कापले गुप्तांग

Crime News:  महिलेने चक्क गुप्तांग (penis) कापल्याची धक्कादायक घटना.

young man who called on a lodge was cut off penis by a woman

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेची छेडछाड करणाऱ्या एका तरुणाला अद्दल घडवण्यासाठी त्या महिलेने त्या तरुणाचे चक्क गुप्तांग कापल्याची विचित्र घटना पुण्याच्या कात्रजमधील परिसरात घडली असून आरोपी महिलेसह तिच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  सदर महिला पुण्यातील एका मयत झालेल्या गुंडाची पत्नी आहे. एक तरुण सतत तिची छेड काढत होता. या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आपल्या तीन साथीदारांसह मिळून तरुणाला मारहाण करत त्याचे लिंग कापले आहे. पूनम निलेश वाडकर असं अटक या आरोपी महिलेचं नाव आहे. तिच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी नोंदवलेल्या घटनाक्रमानुसार, दिनांक १२/११/२०२२ रोजी आरोपी पुनम निलेश वाडकर हिने तक्रारदार तरुणाशी व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करुन त्यांला स्वामी नारायण मंदिर, आंबेगाव खुर्द, पुणे (Pune) येथील चौपाटीवरील हॉटेलसमोर भेटण्यासाठी बोलावले होते.

तरुण हा त्याठिकाणी आल्यानंतर आरोपी पुनम निलेश वाडकर ही त्याठिकाणी तिच्या इतर तीन साथीदारांसह आली. त्या तीन साथीदार यांनी तरुणाला गाड्यांच्या चाव्यांनी डोक्यात मारहाण केली, तसेच हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात दगड मारुन जखमी केले. एवढंच नाही, तर धारदार हत्याराचा धाक दाखवून तरुणाला जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याला मुंबई-बेंगळुरू हायवेने नवीन कात्रज बोगद्यातुन शिंदेवाडी येथून कात्रज जुना बोगदा खेड शिवापुरच्या बाजूच्या रोडपासून थोडे पाठीमागे असलेल्या रस्त्याने आडबाजूला नेले.

यावेळी आरोपी पुनम वाडकर ही आपल्या मित्रासह गाडीवर आली. गाडीवर बसलेल्या एकाने तरुणाला दमदाटी केली. “तु पुनमला लॉजवर घेऊन जाणार का? तुला बायकांना फसवायला पाहिजे? असे म्हणून “थांब तुझा ………. कापतो” असं म्हणत आरोपी पुनम वाडकर आणि तिच्या इतर दोन साथीदारांनी तरुणाला खाली पाडून पकडून ठेवले.

तर दुसऱ्या इसमाने त्याच्या जवळील धारदार हत्याराने तरुणाच्या गुप्त इंद्रियावरील कातडी कापून काढली. नंतर तेच हत्यार तरुणाच्या डोक्यात मारत तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन तरुणाला गंभीर जखमी केले.

एवढंच नाही, तर पोलिसांकडे तक्रार केल्यास खानदान संपवून टाकण्याची धमकी तरुणाला दिली. याबाबत तरुणाने आरोपी पुनम निलेश वाडकर आणि तिच्या इतर तीन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: young man who called on a lodge was cut off penis by a woman

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here