Home अहमदनगर Molested: वाहनचालकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Molested: वाहनचालकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar: चल तुला सोडवितो, असे बोलून पाठीवर हात फिरवत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने मुलीचा विनयभंग (Molested),  शहरातील एका उपनगरातील घटना.

driver molested a minor girl

अहमदनगर:  चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तीकडे अल्पवयीन मुलीने पत्ता विचारला असता त्या वाहनातील व्यक्तीने मुलीसोबत गैरवर्तन (molested) केल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नगर शहरातील एका उपनगरात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात वाहन (एमएच 23 एएस 3044) वरील अनोळखी चालकाविरूध्द विनयभंग, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी व त्यांची अल्पवयीन मुलगी रस्त्याने पायी जात असताना त्या उपनगरातील मोकळ्या मैदानाजवळ आल्या असता मुलीचे दात दुखत असल्याने फिर्यादी या तिच्यासाठी गोळ्या घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेल्या होत्या.

त्याच दरम्यान पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तीकडे फिर्यादीच्या मुलीने एका ठिकाणी जाण्यासाठी लागत असलेला पत्ता विचारला. त्या व्यक्तीने मुलीच्या पाठीवर हात फिरवून,‘चल तू गाडीत बस तुला सोडवतो, असे बोलून मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आहे.

Web Title: driver molested a minor girl

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here