Home संगमनेर सिन्नरची वाळू पोहचली संगमनेरात !  डंपर पकडला : महसूल पथकाची कारवाई

सिन्नरची वाळू पोहचली संगमनेरात !  डंपर पकडला : महसूल पथकाची कारवाई

तळेगाव दिघेत  (Sand) डंपर पकडला : महसूल पथकाची कारवाई.

Sinnar's sand has reached Sangamner Caught the dumper

संगमनेर : सिन्नर तालुक्यातून संगमनेर तालुक्याच्या तळेगाव दिघे परिसरातील तिगाव शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणारा डंपर महसूल पथकाने पकडला. शनिवारी (दि. १२ नोव्हेंबर) रात्री साडेनऊ वाजलेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संबंधित वाहन शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

राज्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीची कायम स्वरूपाची कीड समूळ नष्ट करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महसूल प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. संगमनेर तालुक्यात अवैध गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक बंद असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून अवैध वाळू संगमनेरात येत असल्याचे संगमनेर महसूल पथकाच्या कारवाईत उघड झाले आहे. तळेगाव दिघे परिसरात तिगाव शिवारात सिन्नर घेतली. तालुक्यातील वडांगळी येथून डंपरद्वारे अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची त्यांना माहिती नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना शनिवारी रात्री मिळाली.

त्यानुसार, नायब तहसीलदार कडनोर यांनी समनापूरचे मंडल अधिकारी बाबासाहेब जेडगुले, तलाठी साईनाथ ढवळे, संग्राम देशमुख, सोमनाथ शरमाळे, डी. बी. भालचीम यांसह घटनास्थळी तत्काळ धाव

रात्री साडेनऊ वाजलेच्यादरम्यान एम.एच.११ ए. एल. ४८४८ क्रमांकाचा वाळूचा डंपर मिळून आला. चौकशीअंती मालकाचे नाव राजू खुळे (वडांगळी, ता. सिन्नर) असून, सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथून वाळूची वाहतूक करण्यात आली. यात अंदाजे चार ब्रास वाळू असून, वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे  निष्पन्न झाले.

सदर डंपर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार कडनोर यांनी सांगितले.

Web Title: Sinnar’s sand has reached Sangamner Caught the dumper

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here