दोन युवकांचा अपघातात जागीच मृत्यू तर एकजण गंभीर
Ahmednagar, Pathardi Accident: अज्ञात वाहन व मोटारसायकल यांच्यामध्ये अपघाताची घटना.
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील दोन युवकांचा अपघातात जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात वाहन व मोटारसायकल यांच्यामध्ये अपघाताची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास अमरापूर-सुसरे रस्त्यावरील म्हसोबा वस्तीनजीक घडली.
नामदेव बबन आठरे (वय २८), विजय मारुती मिसाळ (२२, रा. सुसरे, ता. पाथर्डी) अशी अपघातात मृत झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. आदेश शेषराव कंठळी (२१) हा गंभीर जखमी झाला असून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या तिघांना उपचारासाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच आठरे व मिसाळ यांचा मृत्यू झाला होता. मृत नामदेव आठरे याला चार महिन्यांची मुलगी आहे.
Web Title: Two youths died on the spot in the accident
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App