पोलिसांचा छापा, अकोले – संगमनेरात गुटखा जप्त
Sangamner Akole raid: वाशेरे शिवारात १५ लाखांचा, तर संगमनेरात लाखाचा गुटखा जप्त, १५७ गोण्यात होता गुटखा.
अकोले : राज्यात गुटखाबंदी असताना चोरून विक्रीसाठी साठून ठेवलेला १५ लाखांचा गुटखा अकोले पोलिसांनी तालुक्यातील वाशेरे शिवारातील एका घरातून रविवारी दुपारी हस्तगत केला. गुटख्यावरील ही गेली काही वर्षांतील सर्वात मोठी कारवाई आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलिसांनी ही कारवाई केली. हिरा नावाचा अमली गुटखा असलेल्या सलल्या दोन पिकअप गाडीभर हा माल आहे. एका गाडीत ७८ व दुसऱ्या गाडीत ७९ गोण्या अशा एकूण १४७ गोण्या, एका गोणीत १२० पुडे असा १५ लाखांचा मुद्देमाल वाशेरे येथील दत्तात्रय गजे घरातून हस्तगत केला आहे.
त्यात अकोले येथील भारत ट्रेडर्सचा हा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्याण पोलिसांनी काम सुरू होते. याप्रकरणी वसीम तांबोळी यास ताब्यात घेतले असून, अन्न व औषध विभागास याबाबत माहिती दिली आहे. ठिकाणी असल्याची चर्चा आहे. या बाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
संगमनेर : संगमनेर उपविभागीय पोलीस कार्यालयातील विशेष पोलीस पथकाने गुटख्याची वाहतूक होत असलेली कार पकडली. कारवाईत प्रतिबंधित पान मसाला गुटखा आणि कार असा एकूण १ लाख २८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी शिवारात कारवाई करत एका तरुणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिलीप सहादू शिंदे (वय ३४, रा. युनिकॉर्न सोसायटी, ए विंग, गुंजाळवाडी. ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाईक शीतल भोर यांनी गुंजाळवाडी त्याच्याविरुद्ध विशेष पोलीस शिवारात जाऊन कारवाई केली. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी फिर्याद दिली.
राखाडी रंगाच्या कारमध्ये (एम. एच. ०२. ए.के. संगमनेर उपविभागाचे प्रभारी ८७७०) डिक्कीत ठेवलेला पथकातील पोलिसांना आढळून आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महिला पोलीस आहेत.
मुद्देमाल जप्त करत शिंदे याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे अधिक तपास करीत
गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. शुक्रवारी नगर शहरात, तर रविवारी अकोले, संगमनेरमध्ये छापे टाकून गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सामान्य जनता, महिलांमधून कौतुक होत आहे.
Web Title: Police raid, Akole – Gutkha seized in Sangamner
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App